पूणे/दै.मू.वृत्तसेवा
निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. यंदाची निवडणुक ही सात टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिला टप्पा 19 एप्रिलला तर शेवटचा टप्पा 1 जूनला पार पडणार आहे आणि चार जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. अशातच येणार्या निवडणूकीत भारत मुक्ति मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी छत्रपती शाहू महाराज आणि सुप्रीया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
छत्रपती शाहू महाराज यांना कांग्रेस पार्टीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पाटी शरद पवार गटाने सुप्रीया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भारत मुक्ति मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी छत्रपती शाहू महाराज आणि सुप्रीया सुळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या काही मतदारसंघात आणि काही अपक्ष उमेदवारांना देखिल वामन मेश्राम यांना समर्थन दिले आहे.
वामन मेश्राम यांनी आपल्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुवर लिहिले कि छत्रपती शाहू महाराजांचे व बाबासाहेबांचे स्नेहसंबंध लक्षात घेता कोल्हापूर मधून शाहू महाराजांच्या गादीचे वारस वर्तमान शाहू महाराजांच्या उमेदवारीचे आम्ही समर्थन करत आहोत. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनाही आम्ही बारामती लोकसभा मतदार संघात व्यक्तिगत पातळीवर समर्थन करत आहोत.
संविधान धोक्यात आहे असे वांरवार सांगून महाविकास आघाडी अनुसूचित जाती, जनजाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे मनात भय निर्माण करून त्यांचा केवळ मतांसाठी वापर करत आहे व त्यांच्या खऱ्या नेतृत्वाला राजकीय प्रतिनिधीत्व मिळू नये यासाठी प्रयत्नशील आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्याचे निषेधार्थ आम्ही महाराष्ट्रातील बहुतेक लोकसभा मतदार संघात उमेदवार उभे करत आहोत तर काही मतदार संघात वंचित आघाडीच्या व अपक्ष उमेदवारांना परिस्थिती अनुरूप समर्थन देण्याचा निर्णय घेत आहोत.
याशिवाय जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बहुजन मुक्ति पार्टीकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत, त्यांना सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी भारत मुक्ति मोर्चा, बहुजन क्रान्ति मोर्चा आणि समस्त सहयोगी संघटनांचे उम्मीदवार निवडणूक लढणार आहेत, त्यांना मदत करण्याचे आदेश वामन मेश्राम यांनी दिले आहेत.