नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
कोरोना वॅक्सीन कोविशिल्डचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, हे कंपनीने न्यायालयात मान्य केलं आहे. कंपनीच्या या कबुलीमुळे नागरिकांची चिंता वाढली असून ही कोरोना लस घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा आहे. ही लस तयार करणाऱ्या एस्ट्राजेनेका कंपनीने युनायटेड किंग्डमच्या उच्च न्यालयामध्ये काही कागदपत्रं दिली असून, त्यामधून या कंपनीने त्यांच्या कोविड-19 लसीमधून टीटीएससारखा दुर्मीळ आजार होऊ शकतो, अर्थात शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक, कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता वाढते.
त्याशिवाय हा सिंड्रोम शरिरामध्ये बॉडी प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होण्यासही कारणीभूत ठरतो. गेल्या चार वर्षात अॅस्ट्राझेनेकाने पहिल्यांदाच अशी कबुली दिल्याने आता जगभरात याची चर्चा सुरू आहे.
एस्ट्राजेनेका कंपनीला सध्या क्लास अॅक्शन खटल्याचा सामना करावा लागत आहे. हा खटला जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने दाखल केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून तयार करण्यात आलेली एस्ट्राजेनेकाची लस घेतल्यानंतर जेमी स्कॉट हे ब्रेन डॅमेजची शिकार झाले होते. त्याशिवाय इतरही काही कुटुंबांनी अशा शारीरिक तक्रारींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत त्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती.
याचिकेवर उत्तर देताना कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो, अशी कबुली अॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली. आता या कुटुंबांकडून लसीमुळे झालेल्या त्रासाची भरपाई म्हणून नुकसान भरपाईती मागणी करण्यात येत आहे. मात्र हे दुष्पपरिणाम क्वचितच आढळू शकतात, त्यामुळे नागरिकांना घाबरू नये, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.
चार वर्षांपूर्वी जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्यानंतर कोरोनाच्या फैलावास पायबंद घालण्यासाठी व्यापक प्रमाणावर लसीकरण करण्यात आले होते. भारतातही अल्पावधीत कोट्यवधी लोकांना कोरोनाच्या लसीचे दोन डोस देण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाची लस आणि तिच्यापासून होणाऱ्या अपायांबाबतही खूप चर्चा झाली होती. आता कोविशिल्ड ही कोरोना लस तयार करणाऱ्या एस्ट्राजेनेका कंपनीने युनायटेड किंग्डमच्या उच्च न्यालयामध्ये काही कागदपत्रं दिली असून, त्यामधून या कंपनीने त्यांच्या कोविड-१९ लसीमधून टीटीएससारखा दुर्मीळ आजार होऊ शकतो, असा दावा केला आहे. एस्ट्राजेनेका लसीची अनेक देशांमध्ये कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावांनी विक्री करण्यात आली होती.
थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम अर्थात शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक, कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय हा सिंड्रोम शरिरामध्ये बॉडी प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होण्यासही कारणीभूत ठरतो. आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डची लस युनायटेड किंग्डममध्ये दिली जात नाही. तसेच या कंपनीनेही या लसीमुळे होणाऱ्या दुर्मिळ अपायांची बाब मान्य केली आहे. त्यामुळे याने बाधित झालेल्या व्यक्ती आणि कुटुंबांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
माहित असावे कि कोरोना महामारीच्या काळात, फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राजेनेकाने कोरोनाच्या प्रसारावर पायबंद घालण्यासाठी ऑक्सफर्डच्या सहकार्याने कोविड लस तयार केली होती. तर भारतात, लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने एस्ट्राजेनेकाशी करार करून कोविशिल्ड लस तयार केली होती. यानंतर देशातील अर्ध्याहून अधिक लोकांना कोविशील्ड लस देण्यात आली. मात्र आता कंपनीने लसीमुळे होणाऱ्या अपायांची बाब मान्य केल्यानंतर नागरिकांची चिंता वाढली असून ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे.