बंगळुरू/दै.मू.वृत्तसेवा
साल 2008 मध्ये मालेगांव येथे झालेला बॉम्बस्फोट आणि देरशभरात झालेल्या अन्य बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा ब्राह्मणी आतंकवादाचा चेहरा समोर आला आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) साई प्रसाद नावाच्या भाजप कार्यकर्त्याला अटक केली आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एनआयएने दोन मोबाईल शॉपी कामगारांची चौकशी केली.
बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये 1 मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला होता. आरोपीने कॅफेमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली आणि त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला होता. या स्फोटामध्ये 10 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू होता. सुरुवातीला या प्रकरणात पीएफआय संबंधित एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एनआयएने साई प्रसाद नावाच्या भाजपा कार्यकर्त्याला अटक केली आहे.
साई प्रसादला आता चौकशीसाठी एनआयएने ताब्यात घेतले आहे. या स्फोटाशी संबंधित दोन संशयितांचा आणि त्याचा काही संबंध आहे का? याबद्दल चौकशी केली जात आहे. मागच्या आठवड्यात एनआयएने शिवमोग्गा जिल्ह्यात काही ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये आरोपीचे मोबाइल दुकान आणि इतर दोन संशयितांच्या घरावर धाड टाकली होती. बंगळुरुच्या व्हाइटफिल्ड परिसरात स्थित असलेला रामेश्वर कॅफे शहरात लोकप्रिय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने कॅफेमध्ये बॅग सोडली. नाश्ता केल्यानंतर तो बॅग तिथेच सोडून निघून गेला. त्यानंतर बॉम्बस्फोट झाला.
संशयित आरोपीने मास्कने आपला चेहरा झाकलेला असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसत होते. तसेच त्याने चष्मा घातलेला असून डोक्यावर टोपी होती. कॅफेत आल्यानंतर त्याने रवा इडलीची ऑर्डर दिली, आपली ऑर्डर घेऊन जातानाही तो सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 1 मार्च रोजी दुपारी 12.50 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा बॉम्बस्फोट घडला. एका निवेदनात, एनआयएने म्हटले आहे की पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी, तपास एजन्सी फरार झालेल्या आणि अटक केलेल्या आरोपींच्या महाविद्यालयीन आणि शाळेतील मित्रांसह सर्व परिचितांना बोलावून त्यांची तपासणी करत आहे.
या स्फोटानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. चेहरा ओळख प्रणालीद्वारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आरोपीचे वय 25-30 असल्याचे सांगितले जाते. वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी एका बसमधून कॅफेजवळ उतरल्याचे दिसत आहे. कॅफेमध्ये इडली विकत घेण्यासाठी त्याने रोकड दिली होती. इडली खाल्ल्यानंतर तिथेच आपली बॅग सोडून जाताना तो दिसत आहे. कॅफेमध्ये त्याने सात मिनिटं घालवली.
या प्रकरणी एक्स वर कर्नाटकच्या आरोग्य मंत्री पदानुसार, भाजप कार्यकर्त्याला कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली येथून अटक करण्यात आली. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप नेत्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता राज्याच्या भगव्या कळ्या काय म्हणतील की स्फोटाचे कारण आमचे सरकार आहे? याचा अर्थ रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटात भाजपचा हात आहे असे नाही का? कारण भाजप नेत्याला एनआयएने ताब्यात घेतले आहे? तुम्हाला आणखी काही हवे आहे का?“ धार्मिक रक्षणाच्या नावाखाली भाजप राज्यात जो भगवा दहशतवाद चालवत आहे, त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत, याचाच पुरावा आहे? आरएसएसची विचारसरणी देशावर लादणाऱ्या केंद्रातील भाजपला याला काय म्हणायचे आहे?,’ असेही ते म्हणाले.