नाशिक/दै.मू.वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ निवडणुकीत उभे राह ूद्या, मग सांगतो, असा इशारा दिला आहे. यावरून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे. तूम्ही एक भूजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
छगन भुजबळ हे आमेच नेते आहेत, ते कोणत्या पक्षात आहेत, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाणार अशी भूमिका प्रकाश अण्णा शेंडगे यांनी घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात 15 टक्के मराठा आणि 60 टक्के ओबीसी आहेत. त्यामुळे भुजबळांना पाडणं शक्य नाही असंही शेंडगे यांनी स्पष्ट केलंय. तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 मराठे पाडू असा इशाराच प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिलाय.
प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी बहूजन पार्टीच्या उमेदवारांची तिसरी यादी जहीर केली. लोकसभा पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय. बीडमध्ये यशवंत अण्णा गायके, जालन्यात डॉ. तानाजी भोजने, अहमदनगरमध्ये दिलीप खेडकर आणि साताऱ्यात सुरेश कोर्डे यांना उमेवारी जाहीर करण्यात आली आहे. परभणीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीने महादेव जानकर यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसी मतात विभाजन नको म्हणून हरिभाऊ शेळके यांनी येथून आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मराठा समाजाकडून ठिकठिकाणी विरोध होत आहे. बीडमध्ये आम्ही टीपी मुंडे यांना लढण्याची विनंती करत होतो, पण यशवंत अण्णा गायके या धनगर समजतील तरुण तडफदार मुलाचं नाव मुंडेंनी सांगितलं अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिलीय.
जालन्यात रावसाबेह दानवे यांच्याविरोधात ओबीसी बहुजन पार्टीने डॉ. तानाजी भोजने यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, गोरगरीबांसाठी त्यांनी मोफत काम केलं आहे. त्यामुळे दानवे यांच्याविरोधात भोजने यांना उमेदवारी दिल्याचं शेंडगे यांनी सांगितलं. अहमदनगरमध्ये निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्याविरोधात आम्ही दिलीप खेडकर यांना उमेदवारी दिली असून सांगलीत आपण स्वतः लढणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं.